भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर लायक नाही; काँग्रेस खासदाराची टीका
By देवेश फडके | Published: February 7, 2021 08:18 PM2021-02-07T20:18:20+5:302021-02-07T20:20:45+5:30
सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली.
नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. (Congress MP Jasbir S Gill says Sachin Tendulkar does not deserve Bharat Ratna)
शेतकरी आंदोलनाविरोधात ज्यांनी वक्तव्ये केली, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. त्यांची लायकी नाही. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केवळ आपल्या मुलाला इंडियन प्रिमीयर लीगमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारची बाजू घेतली. जनतेने याचा निर्णय घ्यावा. भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर पात्र नाही, असे गिल यांनी म्हटले आहे.
Akshay Kumar's IQ is such that he asks PM if he eats mangoes... getting him to tweet shows govt is afraid. People who spoke against farmers don't have conscience. Sachin Tendulkar toed govt's line to get his son into IPL. He doesn't deserve Bharat Ratna: Congress MP Jasbir S Gill pic.twitter.com/QrvYrhIxcd
— ANI (@ANI) February 7, 2021
अक्षय कुमारवरही हल्लाबोल
अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारतो की, तुम्ही आंबे खाता का, यावरून त्याची वैचारिक पातळी कळते. अक्षय कुमारचा बुद्ध्यांक तेवढाच आहे. त्याचे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेत नाही. या अशा माणसांना ट्वीट करायला लावल्यामुळे सरकारला आता शेतकरी आंदोलकांची भीती वाटू लागली आहे. हेच स्पष्ट होते, असा दावा गिल यांनी यावेळी केला.
"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..."
अलीकडेच शेतकरी आंदोलनाला विविध परदेशी सेलिब्रेटिंनी ट्विटरद्वारे पाठिंबा दर्शवला. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी भारत सरकारवरही टीका केली. सोशल मीडियातून याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर अनेक भारतीय सेलिब्रेटिंनी सरकारची बाजू घेत परदेशी सेलिब्रिटिंना सुनावले. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्लाही दिला. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडू, राजकारणी तसेच दिग्गजांचा समावेश होता.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी शेतकरी आंदोलक ठाम आहेत. मात्र, काही झाले तरी कायदे रद्द करता येणार नाही. शेतकऱ्यांनी सूचना द्याव्यात. कायद्यात तशा प्रकारचे बदल केले जातील. शेतकऱ्यांची चर्चा करण्यास नेहमी तयार आहे, असे सरकारच्या बाजूने सांगण्यात आले आहे.