आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 16:48 IST2020-12-05T16:47:25+5:302020-12-05T16:48:56+5:30
मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे.

आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'
मुंबई - शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करून कंगना रणौत अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. ट्विटरवर तीचे अॅक्टर-सिंगर दिलजीत दोसांझसोबत जबरदस्त व्हर्बल वॉर झाले. गुरुवारी कंगनाने दिलजीतविरोधात लुधियानाचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे जुने ट्विट कोट केले होते. यात रवनीत यांनी दिलजीत दोसांझविरोधात FIRसंदर्भात लिहिले होते. यावरून आता रवनीत यांनी कंगनाला इशारा दिला आहे, की तिने त्यांच्या आणि दिलजीतच्या प्रकरणापासून दूर रहावे. एवढेच नाही, तर त्यांनी कंगनाला 'हिमाचलचे सडलेले सफरचंद' असेही म्हटले आहे. आता यावर कंगना नेमका काय रिप्लाय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर बोलताना खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, कंगना आमच्या अंतर्गत प्रकरणांपासून दूर रहा, पंजाबसाठी आम्ही सर्वजन एक राहू. हिमाचलचे सडलेले सफरचंद तू दूर रहा. एवढेच नाही, तर आमच्या पंजाबी लोकांमध्ये हजारो समस्या असतील, परंतु बाहेरच्या लोकांनी दखल दिलेली आम्ही सहन करणार नाही. मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे.
'अॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली' -
गायक मीका सिंहने कंगना रणौतला सल्ला दिला आहे. कंगना सातत्याने सोशल मीडियावर करत असलेल्या वक्त्यव्यांमुळे मीका हैराण झाला आहे. त्याने म्हटले आहे, कंगनाने केवळ आणि केवळ अभिनय करण्याचे काम करावे. याबाबत त्याने लिहिले की, 'बेटा तुझे टार्गेट काय आहे, हे काही समजत नाही. तू खूप हुशार-सुंदर मुलगी आहेस. अभिनय कर ना यार, अचानक इतकी देशभक्ती तीही ट्विटर आणि न्यूजमध्ये'.