शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

Sonia Gandhi : "मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही"; सोनिया गांधींचा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 3:42 PM

Congress Sonia Gandhi Video : सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत. एकीकडे सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहेत तर दुसरीकडे देशभर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींचा जबाब मनी लॉन्ड्रींग कायद्याच्या सेक्शन ५० अंतर्गत नोंदवला जाणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची पहिल्यांदाच ईडीकडून चौकशी होत आहे. 

ईडीने याआधी राहुल गांधी यांची जवळपास वेगवेगळ्या दिवशी एकूण मिळून ५० तास चौकशी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. "मी इंदिरा गांधींची सून आहे आणि कुणालाही घाबरत नाही" असं सोनिया गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. नाना पटोले यांनी हा व्हिडीओ शेअर करताना #सत्यसाहससोनिया गांधी असा हॅशटॅग देखील वापरला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. याबाबत माहिती मिळू शकलेली नसली. पण आता सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी होत असताना तो तुफान व्हायरल होत आहे.  

"आज देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  "आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "जीएसटीवर चर्चा करा - सभागृह तहकूब, महागाईवर चर्चा - सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा करा - सभागृह तहकूब, एजन्सींच्या गैरवापरावर चर्चा - सभागृह तहकूब. आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अहंकार आणि हुकूमशाहीवर 'सत्या'चा विजय होईल" असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलावलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसला आहे. दिल्लीत पोलिसांकडून सकाळी ९ वाजल्यापासून गोल मेथी जंक्शन, तुगलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन, मान सिंह रोड जंक्शन याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय