काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज, तरुणांना आकर्षित करणं आवश्यक; डॉ. विजय दर्डा यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:38 PM2023-05-30T22:38:53+5:302023-05-30T22:39:31+5:30

Shashi Tharoor: या प्रकाशन सोहळ्यावेळी विजय दर्डा यांनी शशी थरूर यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं. तसेच काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचं मत विजय दर्डा यांनी मांडलं. 

Congress needs a leader like Shashi Tharoor, needs to attract youth; Suggestion by Dr. Vijay Darda | काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज, तरुणांना आकर्षित करणं आवश्यक; डॉ. विजय दर्डा यांची सूचना

काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज, तरुणांना आकर्षित करणं आवश्यक; डॉ. विजय दर्डा यांची सूचना

googlenewsNext

लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियस बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांचं नवं पुस्तक रिंगसाइड अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँडचं प्रकाशन आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते झालं. या प्रकाशन सोहळ्यावेळी विजय दर्डा यांनी शशी थरूर यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं. तसेच काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचं मत विजय दर्डा यांनी मांडलं. 

आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विजय दर्डा म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे खूप वरिष्ठ नेते आहेत. मात्र काँग्रेसला शशी थरूर यांची गरज आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाने तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे, असं स्पष्ट मत विजय दर्डा यांनी मांडलं.

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांचे नवीन पुस्तक ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’चे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज झालं.  हे पुस्तक डॉ. दर्डा यांच्या साप्ताहिक लेखांचे संकलन असून, त्यांनी हे लेख २०११ ते २०१६ दरम्यान ‘लोकमत’ व देशातील प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक दैनिक वृत्तपत्रांत प्रकाशित केले होते.

‘रिंगसाइड’मध्ये विज्ञान, पर्यावरण, अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक विकास, क्रीडा, कला, संस्कृती, विदेशी धोरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर केलेले शोधपूर्ण लेखन आहे. यात प्रसिद्ध व्यक्तींवर लिहिलेल्या लेखांचाही समावेश आहे, ज्यांनी देश व जगात सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

Web Title: Congress needs a leader like Shashi Tharoor, needs to attract youth; Suggestion by Dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.