नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सल्लागार सॅम पित्रोदा यांनी 1984च्या शीख दंगलीसंदर्भात केलेल्या विधानावर काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलं आहे. पित्रोदा यांचे मत हे पक्षाचे मत नाही, असे म्हणत 2002 च्या गुजरात दंगलीचाही संदर्भ दिला आहे.
पक्ष मानतो की 1984 च्या शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळायला हवा, त्यासोबतच 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांनाही न्याय मिळायला हवा. पित्रोदा यांचे मत हे पक्षाचे मत नाही. आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समुहाविरोधात झालेल्या जाती, रंग, धर्मावरून झालेल्या हिंसेची निंदा करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.
तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, मी आधीच पित्रोदांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ही सरकारची जबाबदारी आहे की ही घटना कशी घडली याचा तपास करणे, या मागे कोण जबाबदार होते. या घटनेला किती काळ झाला याला महत्व नाही. वक्तव्यानंतर टीकेचे धनी ठरलेल्या पित्रोदा यांनी ट्विटरवर शीख बांधवांची माफी मागितली. तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज आहे. भाजपाने आपले वक्तव्य छेडछाड करून पसरविले आहे. ते याद्वारे त्यांचे अपयश आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खुलासा केला.