नवी दिल्ली : काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना गद्दार ठरविणारा आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याने सावरकरांचे पणतु रणजीत यांनी काँग्रेस, सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. एखाद्या पक्षाला ट्विटरवरून नोटीस पाठविण्यात आल्याचे बहुदा देशातील हे पहिलेच प्रकरण आहे.काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून मार्च महिन्यात जे टिष्ट्वट करण्यात आले, त्यामुळे सावरकरांचा अपमान झाला असल्याचा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. सावरकर कुटुंबाचे वकील हितेश जैन यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, आम्ही संबंधितांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय होते ट्विटमध्ये२३ मार्चला क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या ट्विटटमध्ये असे म्हणण्यात आले होते की, ‘भगतसिंगांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला तर वि.दा. सावरकरांनी दयेची भीक मागितली इंग्रजांच्या राजवटीत एक गुलाम बनण्यासाठी.’
सावरकरांना ‘गद्दार’ ठरवल्याने काँग्रेसला नोटीस
By admin | Published: June 19, 2016 3:23 AM