शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 1:37 PM

Congress on Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला असून, पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहेत.

Bihar Political Crisis: देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची सुरुवात करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला दिला आहे. तसेच, आज सायंकाळी ते भाजपच्या नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांच्यावर घणाघाती टीका केली. 

काय म्हणाले जयराम रमेश?"वारंवार राजकीय भागीदार बदलणारे नितीश कुमार बदलत्या रंग बदलण्यात सरड्यांनाही कडवी स्पर्धा देत आहेत. हा विश्वासघात करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही. भारत जोडो न्याय यात्रेला पंतप्रधान आणि भाजप घाबरले असून यावरून लक्ष वळवण्यासाठी हे राजकीय नाट्य रचल्याचे स्पष्ट झाले आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

इंडिया आघाडी मजबूत दरम्यान, पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या भविष्याबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, ''भारताची आघाडी मजबूत आहे. काही स्पीडब्रेकर आले आहेत, मात्र आम्ही एकत्र येऊन भाजपविरोधात लढू. सर्व पक्ष - DMK, NCP, TMC आणि SP एकत्र निवडणुका लढवतील आणि भाजपचा पराभव करतील,'' असं ते यावेळी म्हणाले.

राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर नितीश कुमार राजीनामा देणार असल्याचे रविवारी ठरले. त्यांनी रविवारी सकाळी राजभवन गाठून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका होणार असताना नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमधील महाआघाडी तसेच इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा