पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 02:36 PM2024-07-09T14:36:24+5:302024-07-09T14:36:58+5:30
Congress On PM Modi: पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक.
Jairam Ramesh On PM Modi :काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी (Mohammad Hamid Ansari) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी आपल्या पत्रातून केला आहे.
आज जब नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपने घटते कद को बढ़ाने की कोशिश कर रहे हैं, तब मैंने राज्यसभा के माननीय सभापति को पत्र लिखकर राज्यसभा के पूर्व सभापति डॉ. हामिद अंसारी के ख़िलाफ़ उनके अपमानजनक बयान के लिए उनके ख़िलाफ़ विशेषाधिकार कार्यवाही की मांग की है।… pic.twitter.com/fszy2x0hf5
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 9, 2024
जयराम रमेश यांनी काय दावा केला?
जयराम रमेश यांनी हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. यात त्यांनी, पंतप्रधान मोदींनी 2 जुलै 2024 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. आपल्या भाषणादरम्यान, पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचे म्हटले. 'पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने अन्सारी यांच्यावर टीका केली, तशी आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी माजी उपराष्ट्रपतींवर केली नाही, असे रमेश म्हणाले.
काय म्हणाले होते पीएम मोदी?
2 जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “विरोधकांना कितीही आकड्यांचा दावा मांडू द्या. 2014 मध्ये आमची सत्ता आली, तेव्हा राज्यसभेत संख्याबळ खूपच कमी होते. तेव्हा तत्कालीन राज्यसभा अध्यक्ष(हमीद अन्सारी) विरोधकांच्या बाजूने झुकलेले असायचे. तरीदेखील देशाची अभिमानाने सेवा करण्याचा आमचा संकल्प कधीही डगमगला नाही." पीएम मोदींनी नाव न घेता माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, अन्सारी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2017, या काळात राज्यसभेचे अध्यक्ष होते.