शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 2:36 PM

Congress On PM Modi: पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक.

Jairam Ramesh On PM Modi :काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी (Mohammad Hamid Ansari) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी आपल्या पत्रातून केला आहे. 

जयराम रमेश यांनी काय दावा केला?जयराम रमेश यांनी हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. यात त्यांनी, पंतप्रधान मोदींनी 2 जुलै 2024 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. आपल्या भाषणादरम्यान, पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचे म्हटले. 'पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने अन्सारी यांच्यावर टीका केली, तशी आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी माजी उपराष्ट्रपतींवर केली नाही, असे रमेश म्हणाले.  

काय म्हणाले होते पीएम मोदी?2 जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “विरोधकांना कितीही आकड्यांचा दावा मांडू द्या. 2014 मध्ये आमची सत्ता आली, तेव्हा राज्यसभेत संख्याबळ खूपच कमी होते. तेव्हा तत्कालीन राज्यसभा अध्यक्ष(हमीद अन्सारी) विरोधकांच्या बाजूने झुकलेले असायचे. तरीदेखील देशाची अभिमानाने सेवा करण्याचा आमचा संकल्प कधीही डगमगला नाही." पीएम मोदींनी नाव न घेता माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, अन्सारी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2017, या काळात राज्यसभेचे अध्यक्ष होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा