भाजपाची सत्ता असलेल्या आणि केंद्रीय मंत्रापदासाठी आमदारकी सोडाव्या लागलेल्या उत्तर प्रदेशच्या घोसीमध्ये सपाने कमाल केली आहे. घोसी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 19व्या फेरीनंतर सपा उमेदवार सुधाकर सिंह 25135 मतांनी आघाडी घेतली आहे. तर अन्य राज्यांतील सहा मतदारसंघात एका जागेवर काँग्रेस, टीएमसी, झामुमो, सपा आणि तीन जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.
घोसीमध्ये सपाला 74946, भाजपाला 49813 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु असून लवकरच निकालही जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये डुमरी पोटनिवडणुकीत झामुमोने दणदणीत विजय मिळवला आहे. बेबी देवी यांनी एनडीएच्या यशोदा देवी यांचा 15 हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभेची जागा भाजपने जिंकली आहे. भाजपच्या उमेदवार पार्वती दास यांनी काँग्रेसच्या बसंत कुमार यांच्यापेक्षा २,७२६ मते जास्त मिळविली आहेत. काँग्रेसने केरळमध्ये पुथुपल्लीमध्ये विजय मिळविला आहे. बंगालच्या धुपगुरी जागेवर टीएमसीचा उमेदवार विजयी झाला आहे. टीएमसीचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांनी 4,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. भाजपाने त्यांच्याविरोधात शहीद सीआरपीएफ जवानाची पत्नी तापसी रॉय यांना उतरविले होते.
त्रिपुराच्या बॉक्सानगर जागेवर भाजपने 34146 मतांनी मोठा विजय मिळविला आहे. धनपूरमध्ये भाजपाने पहिला विजय नोंदवत खाते उघडले होते.