ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१ - लोकसभा आणि राज्यसभेमध्ये GST विधेयक मंजूर करण्यासाठी आम्ही सरकारला मदत केली पण मुळातच त्या विधेयकामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यावर आमचा आक्षेप आहे. विधेयकातील त्रुटी दुर करण्यात सरकारला यश आले तर आमचा त्यांना पाठींबाच असेल असे मत काँसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मांडले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
प्रस्तावित वस्तू आणि सेवाकर विधेयकाबाबत (जीएसटी) काँग्रेससह अन्य पक्षांचेही आक्षेप आहेत. या त्रुटींवर तोडगा निघालेला नाही. उशीर झाला तरी एक परीपूर्ण विधेयक समंत व्हावं हे आमचं मत आहे. लोकसभेत ६७ तर राज्यसभेत ४५ विधेयकं मंजूर करण्यात आम्ही सरकारला साथ दिली आहे असेही ते म्हणाले.
सरकारने निवडणूक लढवताना दिलेली अश्वासने पुर्ण केली नाहीत, अन्न, विज, पाणी, वाहतूक यांच्या किमतीबरोबरच देशात अपराध आणि असहिष्णुता वरचेवर वाढत असल्यामुळे लोक दु:खी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर लोक नाखुश असल्याच सांगत पंतप्रधानाच्या परदेश दौऱ्यावर त्यांनी टिका केली. तर आजपासून सुरु झालेल्या 'आप' सरकारच्या सम-विषम योजनेच कौतुक करायला ते विसरले नाहीत.