CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:30 PM2021-04-30T12:30:03+5:302021-04-30T12:51:05+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates P Chidambaram And Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यापूर्वीच राज्यांकडून कोरोनाच्या लसीच्या टंचाईचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी लसींच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (corona vaccination in India) देशातील विविध राज्यांना आतापर्यंत 16 कोटी लसी पुरवण्यात आल्या असून, त्यामधील 1 कोटी डोस राज्यांकडे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक राज्यांनी लसींचा मोठा तुटवडा असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.
पी चिदंबरम यांनी 1 मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची कसोटी असणार असल्याचं म्हटलं आहे. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत हल्लाबोल केला आहे. "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतंही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. इतकंच नाही तर CoWin App ही सहकार्य करत नाही. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
कोई भी राज्य 18-44 वर्ष की आबादी के लिए टीकाकरण शुरू करने के लिए तैयार नहीं लग रहे हैं। यहां तक कि CoWin ऐप भी सहयोग नहीं कर रहा है!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 29, 2021
यदि टीके के अभाव के आधार पर लोगों को 1 मई के बाद टीकाकरण केंद्रों से हटा दिया जाता है, तो क्या स्वास्थ्य मंत्री इस्तीफा देंगे?
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत राज्यांना 16 कोटी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत असं म्हटलं आहे. तसेच त्यामधील 15 कोटी लसींचा वापर झाला आहे. तर एक कोटी डोस शिल्लक आहेत. काही लाख डोस पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये उपलब्ध होतील. आतापर्यंत राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार लसीचा पुरवठा झाला नाही, असा एकही दिवस आलेला नाही असं देखील सांगितलं. यानंतर आता पी चिदंबरम यांनी कोरोना लसीकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना सणसणीत टोला लगावला होता.
CoronaVirus Live Updates : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र, म्हणाले...#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#NarendraModi#IMAhttps://t.co/gwvSOZR7Vzpic.twitter.com/aH89I9FGeH
— Lokmat (@MiLOKMAT) April 28, 2021
लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्ध असा सवाल विचारला होता. तसेच मोदी सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणत हल्लाबोल केला होता. "एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच "पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?" असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला. "पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे" असा आरोप देखील त्यांनी केला होता.
"येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, सध्याची दुर्दशा असहनीय"https://t.co/D5xbXABnBB#coronavirus#CoronavirusIndia#coronavaccination#Congress#RahulGandhi#modigovernmentpic.twitter.com/DgknSOnbQR
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
CoronaVirus News : "कोरोनाची लढाई चार स्तंभावर टिकून - चाचणी, उपचार, शोध आणि लसीकरण. तुम्ही पहिला स्तंभच पाडला तर या जीवघेण्या व्हायरसला कसं काय हरवणार?"#CoronavirusIndia#CoronavirusCrisis#priyankagandhi#Congress#YogiAdityanath#UttarPradeshhttps://t.co/Ta8QNDwjGapic.twitter.com/arbPhYKQ7x
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2021