शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:30 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates P Chidambaram And Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यापूर्वीच राज्यांकडून कोरोनाच्या लसीच्या टंचाईचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी लसींच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (corona vaccination in India)  देशातील विविध राज्यांना आतापर्यंत 16 कोटी लसी पुरवण्यात आल्या असून, त्यामधील 1 कोटी डोस राज्यांकडे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक राज्यांनी लसींचा मोठा तुटवडा असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.

पी चिदंबरम यांनी 1 मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची कसोटी असणार असल्याचं म्हटलं आहे. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत हल्लाबोल केला आहे. "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतंही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. इतकंच नाही तर CoWin App ही सहकार्य करत नाही. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत राज्यांना 16 कोटी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत असं म्हटलं आहे. तसेच त्यामधील 15 कोटी लसींचा वापर झाला आहे. तर एक कोटी डोस शिल्लक आहेत. काही लाख डोस पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये उपलब्ध होतील. आतापर्यंत राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार लसीचा पुरवठा झाला नाही, असा एकही दिवस आलेला नाही असं देखील सांगितलं. यानंतर आता पी चिदंबरम यांनी कोरोना लसीकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना सणसणीत टोला लगावला होता. 

"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला

लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्ध असा सवाल विचारला होता. तसेच मोदी सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणत हल्लाबोल केला होता. "एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच "पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?" असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला. "पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे" असा आरोप देखील त्यांनी केला होता.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसP. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या