CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:16 PM2021-05-09T13:16:57+5:302021-05-09T13:19:06+5:30

CoronaVirus: जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यास भारत सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

congress p chidambaram criticised pm modi and centre govt over corona situation in country | CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

Next
ठळक मुद्देदेशाची जाहीर माफी मागावीआरोग्य मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावापी. चिदंबरम यांची मागणी

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यास भारत सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली असून, केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (congress p chidambaram criticised pm modi and centre govt over corona situation in country)

भारतात २ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, दररोज जवळपास ३ लाख ७८ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतेय. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे २ लाख २२ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. रुग्णालये भरली आहेत आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून, त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाला आहे, असे ‘द लॅन्सेट’ने म्हटले आहे. यावरून आता केंद्रावर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

देशाची जाहीर माफी मागावी

आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी लाज शिल्लक असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच कोरोना संकटाशी लढण्याचे काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावे. आरोग्य मंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये, असेही पी. चिदंबरम यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे

दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांची तुलना करणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

“देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. 
 

Web Title: congress p chidambaram criticised pm modi and centre govt over corona situation in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.