शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे नव्या कोषाध्यक्षाच्या शोधात आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना पाहता नवा कोषाध्यक्ष नियुक्त करणे पक्षासाठी गरजेचे बनले आहे.
अशोक गेहलोत यांचा विचार केला तरी अशीच अडचण येणार आहे. गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडायला सहज तयार होणार नाहीत. कमलनाथ मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनाही या दोन्ही जबाबदाऱ्यांतून हटवावे लागेल. दिग्विजय सिंह हेदेखील या पदासाठी उपयोगी सिद्ध होऊ शकतात व सध्या त्यांच्याकडे अशी कोणतीही जबाबदारी नाही की, ज्यासाठी पक्ष नेतृत्वाला संघटनेत बदल करावा लागेल.
वेणुगोपाल, गेहलोत, कमलनाथ यांची चर्चाnही जबाबदारी कोणाकडे सोपवावी हे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. सूत्रांनी सांगितले की, नेतृत्व ज्या नावांचा विचार करत आहे त्यात के. सी. वेणुगोपाल, अशोक गेहलोत, कमलनाथ आदींसह इतर काही नेते आहेत.
nपक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी अशा नेत्याच्या शोधात आहेत जो पक्षासाठी चांगल्या पद्धतीने निधी उभा करू शकेल व १० जन पथच्या विश्वासास पात्र होईल. के. सी. वेणुगोपाल यांना ही जबाबदारी देण्याचा अर्थ असेल की, पक्ष श्रेष्ठींना नव्या संघटनेशी संबंधित प्रशासनिक प्रकरणांना बघण्यासाठी नवी नियुक्ती करावी लागेल.