काँग्रेस ३५ पत्रकार परिषदा घेणार, अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला घेरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:53 PM2019-10-29T22:53:35+5:302019-10-29T22:54:20+5:30
देशावर आलेले मंदीचे सावट आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अडचणीत आलेले आहे.
नवी दिल्ली - देशावर आलेले मंदीचे सावट आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अडचणीत आलेले आहे. आता अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसकडून देशभरात ३५ पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदांमधून देशातील आर्थिक परिस्थितीबाबत मोदी सरकारला सवाल विचारले जातील.
Congress party to hold 35 press conferences from November 1st to 8th against Central government over economic situation. The party will also hold protests from November 5th-15th over the matter. pic.twitter.com/wOqetHFGOY
— ANI (@ANI) October 29, 2019
१ ते ८ नोव्हेंबरदरम्यान काँग्रेसकडून या पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान काँग्रेसकडून देशभरात आर्थिक प्रश्नांवरून आंदोलन करण्यात येणार आहेत. याचदरम्यान ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत.