शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदी यापुढे गांधी घराण्यातील व्यक्ती नको, या प्रियांका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर त्या पक्षाचे बहुतांश नेते जाहीर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. प्रदीप छिब्बर व हर्ष शाह या दोघांनी मिळून संपादन केलेल्या इंडिया टुमारो हे पुस्तक लिहिले आहे. त्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत हे वक्तव्य आहे.प्रियांका गांधी यांच्या वक्तव्याचे काँग्रेसमधील फक्त शशी थरुर यांनीच जाहीर समर्थन केले आहे. इंडिया टुमारो या पुस्तकाचे लेखक हर्ष शाह मॅकेन्झीशी संबंधित असून ते अमेरिकेतील बोस्टन येथे कार्यरत आहेत तर प्रदीप छिब्बर हे कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संबंधित आहेत. या पुस्तकामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, स्मृती इराणी आदी नेत्यांच्या मुलाखतीही प्रसिद्ध करण्यात आल्या असून हे पुस्तक आॅक्सफर्डने प्रकाशित केले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपली असून त्याच वेळेस हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसमध्ये त्यातील प्रियांका गांधी यांच्या मुलाखतीवरून कुजबूज सुरू झाली.>राहुल गांधी यांनाउघड विरोध नाहीराहुल गांधी यांना अध्यक्ष करू नये असे मत असलेला एक गट पक्षामध्ये आहे. मात्र ते राहुल गांधी यांना जाहीररित्या विरोध करू इच्छित नाहीत. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मत व्यक्त करूनसुद्धा काँग्रेस नेते गप्प आहेत. अहमद पटेल, पी. चिदम्बरम यांच्यासारखे नेतेही काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. मात्र राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावे असे मत ए. के. अॅन्टोनी यांनी याआधीच व्यक्त केले होते.
काँग्रेसचा पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको- प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:13 AM