नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून दिग्विजय सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
काँग्रेसचे उमेदवार असे -कर्नाटक : चिकोडी- प्रकाश हुक्केरी, बेळगाव- विरुपाक्षी एस. सिधुन्नावर, बागलकोट- वीणा कशप्पानवर, गुलबर्गा- मल्लिकार्जुन खरगे, रायचूर- बी. व्ही. नायक, बिदर- ईश्वर खंडारे बी., कोप्पल- राजशेखर हितनल, बेल्लारी- यू. एस. उगरप्पा, हवेरी- डी. आर. पाटील, दवनागेरे - शामनूर शिवशंकरप्पा, दक्षिण कन्नड- मिथुन राय, चित्रदुर्ग- बी. एन. चंद्राप्पा, म्हैसूर- विजयशंकर, चामराजनगर- आर. ध्रुव नारायण, बंगळूर (ग्रामीण)- डी. के. सुरेश, बंगळुरू-मध्य -रिझवान अर्शद, चिकबल्लापूर - डॉ. एम. वीरप्पा मोईली, कोलार- के. एच. मुनियप्पा.मध्यप्रदेश : टिकमगढ-किरण अहिरवार, खजुराहो- कविता सिंग, शाहडोल- प्रमिला सिंग, बालाघाट- मधू भगत, होशंगाबाद- शैलेंद्र दिवाण, भोपाळ- दिग्विजयसिंह, मंदसौर- मीनाक्षी नटराजन, रतलाम- कांतिलाल भुरिया, बेतुल- रामू टेकम.मणिपूर : इन्नर मणिपूर- ओ. नवकिशोर सिंग, आऊटर मणिपूर- के. जेम्स.उत्तराखंड : टेहरी गढवाल- प्रितम सिंग, गढवाल- मनीष खंडुरी, अलमोरा- प्रदीप टामटा, नैनिताल-उधमसिंगनगर- हरीश रावत, हरिद्वार- अंबरीश कुमार.उत्तर प्रदेश : अमरोहा- राशीद अल्वी, मथुरा- महेश पाठक, ओनला- कुंवर सर्वराज सिंग. महाराष्ट्र : नांदेड - अशोक चव्हाण