शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

उत्तर प्रदेशसाठी ठरवली काँग्रेस पक्षाची रणनीती

By admin | Published: April 02, 2016 1:53 AM

काँग्रेस व राहुल गांधींचे नवे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्य राज्यातल्या १00 जागा जिंकण्यावर केंद्रित केले आहे.

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीकाँग्रेस व राहुल गांधींचे नवे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्य राज्यातल्या १00 जागा जिंकण्यावर केंद्रित केले आहे. वर्षभराचा अवकाश असलेल्या या निवडणुकांमधे देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात कोणत्याही पक्षाचे संख्याबळ १२५पेक्षा अधिक असणार नाही, असा प्रशांत किशोर यांचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेची लढत तिरंगी नव्हे तर चौरंगी बनवून सत्तेच्या समीकरणांमधे काँग्रेस पक्षाला अपरिहार्य बनवण्याचा प्रशांत किशोर प्रयत्न करीत आहेत.उत्तर प्रदेश निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी लखनौमधे राज्यातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांची नुकतीच एक बैठक पक्षाने आयोजित केली होती. बैठकीत प्रशांत किशोरांनी आगामी निवडणुकीबाबत मोजक्या शब्दांत आपल्या व्यवस्थापन नियोजनाचे सूत्र मांडले, ते ऐकल्यावर उपस्थित तमाम काँग्रेसजन चकित झाले. प्रशांत किशोर यांच्या कल्पकतेतून राज्याच्या विविध भागात राहुल गांधींच्या २00 लक्षवेधी सभांचे नियोजनही आजच तयार आहे. यापूर्वी काँग्रेसने इतकी गतिशिलता कधीच दाखवली नव्हती.नरेंद्र मोदींचा २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतला दैदिप्यमान विजय आणि २0१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या कल्पक व्यवस्थापनामुळे नितीशकुमारांना चमत्कारिक विजय संपादन करून दिल्यानंतर, निवडणूक प्रचार व्यवस्थापनाबद्दल प्रशांत किशोर जगातल्या अनेक राजकीय पक्षांच्या कुतुहलाचा विषय बनले आहेत. उत्तरप्रदेशात त्यांचा फॉर्म्युला किती यशस्वी ठरतो, त्याकडे काँग्रेससह सर्वांचेच लक्ष आहे.