ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 09:26 AM2018-02-16T09:26:15+5:302018-02-16T09:27:02+5:30

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरवर काँग्रेस पक्षाला ट्रोल केलं जातंय.

congress party trolled after saying than you to sonam kapoor on twitter | ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल

ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल

Next

मुंबई- सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरवर काँग्रेस पक्षाला ट्रोल केलं जातंय. सोनम कपूरला ट्विटवर थँक्यू बोलल्याने काँग्रेस पक्ष ट्रोलिंगचं कारण बनतं आहे. अभिनेत्री सोनम कपूरने गुरूवारी काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केलं. काँग्रेस पक्षाला ट्विटरवर फॉलो केल्याने पक्षाकडून सोनम कपूरचे आभार मानण्यासाठी धन्यवादचा मेसेज काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आला. याच ट्विटमुळे काँग्रेसला नेटिझन्स ट्रोल करत आहेत. काँग्रेस पक्षाला ट्विटवर इतरही अनेक जण फॉलो करतात. सगळ्यांना धन्यवाद न देता सोनम कपूरसाठी ट्विट केलं. काँग्रेस पक्ष लोक बघून आभार मानता का? असा प्रश्न नेटिझन्सनी उपस्थित केला. राजकीय पक्ष आता सिनेमांचं प्रमोशन करायला लागली आहेत, अशी टीकाही अनेकांनी केली. 





 

'धन्यवाद सोनम कपूर. तू सुंदर आणि प्रेरणादायी आहेस. वीर दी वेडिंग सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहोत, अजून वाट नाही पाहू शकत, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं. काँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट येताच लोकांनी कमेन्ट करायला सुरूवात केली व काँग्रेसला ट्रोल करायला सुरूवात केली. फक्त काँग्रेसलाच नाही तर सोनम कपूरलाही ट्रोल करण्यात आलं. एक सारख्या आयक्यू लेव्हलची लोक एकमेकांना फॉलो करतात, असं नेटिझन्सने म्हंटलं. 





 

काँग्रेसला ट्रोल करताना अनेक युजर्सने म्हंटलं की, काँग्रेसला आता एक अॅक्टिंग स्कूल सुरू करायला हवी. काँग्रेसच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून झालेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर युजर्सने बोलायची एकही संधी सोडली नाही. लोकांनी टीका तर केली त्याबरोबर काँग्रेसचा स्वभाव असाच असल्याचं अनेकांनी म्हंटलं. 
 







 

Web Title: congress party trolled after saying than you to sonam kapoor on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.