शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा सोनियाच? सीडब्ल्यूसी बैठकीत मिळू शकते मुदतवाढ

By admin | Published: September 04, 2015 10:45 PM

नवी दिल्ली : काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) येत्या ८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.

नवी दिल्ली : काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) येत्या ८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.
पक्षाच्या सूत्रांनी शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले. गत १८ वर्षांपासून काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सोनियांचा वर्तमान कार्यकाळ यावर्षी डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. पक्ष सूत्रांच्या मते, जानेवारी २०१३ मध्ये राहुल गांधी यांच्या खांद्यावर पक्ष उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. मात्र पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास ते अद्याप तयार नाही. याशिवाय बिहार निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वबदल केल्यास प्रतिकूल परिणामाची शक्यताही पक्षाला वाटू लागली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनाच पक्षाध्यक्षपदी कायम ठेवून त्यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी दीर्घ रजेवर गेलेले आणि त्यानंतर आक्रमकपणे राजकारणात सक्रिय झालेले राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद सोपवले जाणार असल्याची चर्चा राजकीय गोटात होती. तथापि काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक अचानक रद्द केली. ही निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार होती. एका ज्येष्ठ पक्ष नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनियांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढविण्याचा प्रस्ताव सीडब्ल्यूसी बैठकीत मांडला जाऊन तो मंजूर होऊ शकतो.