Congress President: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Ganhdi) यांनी अध्यक्ष होण्यासाठी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे समोर आली होती. एकीकडे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी अनेक राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधींचा नकार2017 साली राहुल गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, पण भाजपकडून 2019 मध्ये मिळालेल्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या हंगामी अध्यक्ष झाल्या. आता काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे, याची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्ष होण्यास नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली. यातच आता शशी थरुर यांचेही नाव चर्चेत आले आहे.
सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाणपरदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आज शशी थरूर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. या भेटीनंतर शशी थरुर पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः सोनिया गांधी यांनीच थरुर यांना निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. एएनआयनेही सूत्र्यांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे आता शशी थरुर पक्षाध्यक्ष होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.