Congress President Election: राजस्थान (Rajasthan) आणि दिल्लीतील (Delhi) काँग्रेस कार्यकारीणीनंतर आज छत्तीसगड (Chhattisgarh) काँग्रेसनेहीराहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काल हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. राहुल गांधींचे मन वळवण्याच्या काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून विविध राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत.
छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि इतर एआयसीसी (All India Cngress Comitee) प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. पक्षाचे राज्य मुख्यालय 'राजीव भवन' येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
एकमताने ठराव मंजूरबघेल म्हणाले की, राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर पुन्हा बसवण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. या प्रस्तावाला राज्यातील सर्व प्रमुखांनी एकमताने संमती दिली. मोहन मरकम यांनी AICC शिष्टमंडळ, प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांना कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला. यालाही पाठिंबा देण्यात आला असून दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.
राजस्थान काँग्रेसकडून आला होता प्रस्ताव सीएम भूपेश बघेल म्हणाले की, अध्यक्ष मोहन मरकम यांना हा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी रिटर्निंग ऑफिसर मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे नेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजस्थान काँग्रेस कमिटीकडून आला आहे. छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे जिथून हा प्रस्ताव जात आहे. असे प्रस्ताव इतर राज्यांतील काँग्रेसकडूनही येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचा विचार करावा.