Congress President Election: नवा ट्विस्ट! बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार, म्हणाले...'मी तर त्यांचा सूचक'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:10 PM2022-09-30T12:10:26+5:302022-09-30T12:14:09+5:30
Congress Presidental Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Congress Presidental Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अगदी कालपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारीचा अर्ज दाखल करणार हे निश्चित होतं. पण आज सकाळी दिग्विजय सिंह यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे.
'गेहलोत आऊट, दिग्विजय सिंग इन'; मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, गेहलोत यांचं वक्तव्य
"खर्गे निवडणूक लढवणार असतील तर आपण त्यांच्याविरोधात कधीच निवडणूक लढविण्याचा विचार करू शकत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर माझा तुम्हाला पाठिंबा आहे आणि मी तूमच्या प्रस्तावाचा सूचक म्हणून उपस्थित राहीन असं त्यांना सांगितलं आहे", असं स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिलं आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांचं नाव आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर गेलं आहे. याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव सर्वात आधी आघाडीवर होतं. पण राजस्थानातील राजकारण आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा पेच पाहता अशोक गहलोत यांनी माघार घेतली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गहलोत यांची माघार, मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले...
दुसरीकडे शशी थरूर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"