Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 03:26 PM2022-10-19T15:26:55+5:302022-10-19T15:27:32+5:30

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली.

Congress President Election: Shashi Tharoor wishes Mallikarjun Kharg; He said- 'The work of strengthening the party starts from today...' | Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

Next

Congress President Election: सूमारे दोन दशकानंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गेंची अभिनंदन केले. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची प्रक्रिया आज पार पडली. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांना 7897 तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. थरूर यांनी खर्गे यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आणि पक्षाच्या पुनरुज्जीवनाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष होणे हा मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. खर्गे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एक हजाराहून अधिक मते मिळणे, हा माझ्यासाठी मोठा मान आहे, असेही ते म्हणाले. 

निवडणुकीत एकूण 9497 मतदान झाले
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या मतमोजणीत खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी यांना 1072 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9497 मतदान झाले. खर्गे यांना काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा पाठिंबा मिळाला. 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 

काँग्रेस मुख्यालयाबाहेर विजयाचा जल्लोष
काँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. खर्गे यांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा करत आहेत. विजयानंतर सचिन पायलट, गौरव गोगोई, तारिक अन्वर आदी नेत्यांनी खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय मोठ्या संख्येने कार्यकर्तेही त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

Web Title: Congress President Election: Shashi Tharoor wishes Mallikarjun Kharg; He said- 'The work of strengthening the party starts from today...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.