शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, 80 नाही 90 नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
2
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
3
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
4
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
5
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
6
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
7
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
8
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
9
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
10
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
11
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
12
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
13
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
14
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
15
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
16
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
17
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
18
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
19
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
20
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 

Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 3:59 PM

Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या शर्यतातीत अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. अशातचा तिरुअनंतपूरचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर(Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. या चर्चांवर स्वतः थरुर यांची प्रतिक्रिया आली आहे. 

'मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात'एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतमध्ये शशी थरूर म्हणाले की, 'मला यावर भाष्य करण्याची गरज नाही. मी माझ्या लेखात जे लिहिले आहे तेच मी सांगेन. काँग्रेस पक्षात निवडणुका झाल्या तर पक्षाचेच भले होईल.' थरूर यांनी 'मातृभूमी' या मल्याळम दैनिकात एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी "मुक्त आणि निष्पक्ष" निवडणुकांचे आवाहन केले आहे.

या लेखात त्यांनी म्हटले की, 'पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत. AICC आणि PCC सदस्यांना पक्षातील या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची परवानगी दिली पाहिजे.' विशेष म्हणजे, शशी थरूर हेदेखील काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, जे पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आहेत.

काँग्रेस अध्यक्षाची नितांत गरजथरूर यांनी आपल्या लेखात लिहिले की, "मला अपेक्षा आहे की, अनेक उमेदवार स्वत:चे विचार मांडण्यासाठी पुढे येतील. पक्ष आणि देशासाठी त्यांची दूरदृष्टी मांडल्याने जनहित नक्कीच जागृत होईल. पक्षाला सध्या नूतनीकरणासह एका चांगल्या अध्यक्षाचीही गरज आहे. पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संकट आणि देशातीलचित्र पाहता अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि मतदारांना प्रेरित करण्याची दुहेरी जबाबदारी असेल. पक्षाच्या भावी अध्यक्षाकडे भारतासाठी एक व्हिजन असायला हवे.' 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करत असलेल्या काँग्रेसने रविवारी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. अशी लोकशाही पद्धती पाळणारा हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPresidentराष्ट्राध्यक्षShashi Tharoorशशी थरूर