शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 6:12 PM

Congress Elections: मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरूरांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Congress Slams Shashi Tharoor: निवडणुकीद्वारे मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. पण, शशी थरूर यांनी निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. पण, पक्षाने थरूर यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी, थरूर यांचे मुख्य पोलिंग एजंट सलमान सोज यांच्याद्वारे निशाणा साधला आहे.

मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, शशी थरूर यांच्या पोलिंग एजंटचे दोन चेहरे आहेत. एक माझ्या समोर होता, ज्यात आमच्या उत्तरांनी समाधानी होता. दुसरा, ज्यात तुम्ही मीडियासमोर हे सगळे आरोप करायला सुरुवात केली. आम्ही तुमची विनंती मान्य केली, तरीही तुम्ही केंद्रीय निवडणूक प्राधिकरणावर तुमच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप करत मीडियासमोर गेलात.

थरूर यांचा आरोप चुकीचाशशी थरूर यांचे मुख्य पोलिंग एजंट सलमान सोज यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानादरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. पोलिंग एजंटशिवाय पेट्या सील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोज यांनी इतर राज्यांवरही मतदानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

थरूर यांचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लिहिलेले हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये लीक होत असलेल्या पत्रावर शशी थरूर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला लिहिलेले अंतर्गत पत्र मीडियात लीक होणे दुर्दैवी आहे. वाढता वाद पाहून थरूर म्हणाले की, पक्षाध्यक्षाची ही निवड काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आहे, फूट पाडण्यासाठी नाही. 24 वर्षांनंतर बिगर गांधी अध्यक्ष झालामल्लिकार्जुन खर्गे यांची 24 वर्षानंतर पहिल्यांदाच गैर-गांधी अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडणुकीत त्यांनी शशी थरूर यांचा पराभव केला. बुधवारी (19 ऑक्टोबर) आलेल्या निकालात खर्गे यांनी शशी थरूर यांचा 6825 मतांनी पराभव केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांना 7897 मते मिळाली, तर थरूर यांना 1072 मते पडली. मल्लिकार्जुन खरगे 26 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी