काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दोघेही आपापल्या भाषणांत परस्परविरोधी विधाने करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक हैं तो सेफ हैं" आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या "बंटेंगे तो कटेंगे" या घोषणांवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी आणि योगींनी देशात कोणती घोषणा लागू करायची, हे आधी ठरवावे, म्हणजे नागरिकांत संभ्रम निर्माण होणार नाही, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही" -मल्लिकार्जुन खर्गे झारखण्डमधील पलामू येते छत्तरपूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी एका प्रचार सभेत बोलत होते. ते म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' सारखे वक्तव्य कुण्याही साधूचे असू शकत नाही. कुठलाही साधू अशा पद्धतीचे वक्तव्य करू सखत नाही. असे दहशतवादीच म्हणू शकतात, आपण नाही." नाथ सांप्रदायातील कुणीही साधू असे बोलू शकत नाही. 'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही."
लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश -"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप करत खर्गे म्हणाले, आपली सत्ता वाचवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी, देशात लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश आहे. एवढेच नाही, तर अशा प्रकारची वक्तव्ये "दादागिरी"चे प्रतीक असल्यचेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते कर्नाटकात बोलत होते.