Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:42 PM2024-02-02T16:42:43+5:302024-02-02T16:48:39+5:30
काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला.
Congress ( Marathi News ) : काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य डी के सुरेश यांनी केले. यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याप्रकरणी आज राज्यसभेत चर्चा झाली. या वक्तव्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
"...तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोल
मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, ''जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. तो कोणत्याही पक्षाचा असो. मी स्वत: म्हणेन की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एक आहोत आणि एकच राहू' यावेळी खरगे यांनीही लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले.यावेळी खरगे यांच्या भाष्याने सभागृहात हशा पिकला. बहुमत तुमचेच असल्याचे खर्गे म्हणाले. आधीच ३३० खासदार आहेत, आता घोषणाबाजी ४०० पारची आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले यावेळी पीएम मोदींनाही हसू आवरले नाही.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या दक्षिण भारताला वेगळा देश बनवण्याच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. थरूर म्हणाले की, हा संसदेबाहेरचा विषय आहे.
या संपूर्ण प्रकरणावर भाजपने कडक भूमिका घेतली असून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल या सभागृहातील काँग्रेसचे सदस्य डीके सुरेश यांचे बंधू अर्थसंकल्पावर बोलताना देशाच्या फाळणीबाबत बोलले. काँग्रेस नेत्याने संविधानाचाही अवमान केला आहे. देशाचे विभाजन करण्याची काँग्रेसची परंपरा कायम आहे. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देऊन देशाची माफी मागावी. ते या वक्तव्यासोबत आहेत का, हे काँग्रेसने सांगावे, असंही जोशी म्हणाले.
दरम्यान, आता खरगे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हिडीओ ट्विट करुन काँग्रेसला टोला लगावला आहे. "विरोधकांनी मान्य केले. तिसऱ्यांदा ४०० पार!, असं ट्विट स्मृती इराणी यांनी केले.
विपक्ष ने कर लिया स्वीकार,
— Smriti Z Irani (@smritiirani) February 2, 2024
तीसरी बार में 400 पार! pic.twitter.com/AWvbZexcaK