'मतं कमी होऊ लागतात तेव्हा...', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदी सरकारवर खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:29 PM2023-08-29T19:29:11+5:302023-08-29T19:30:19+5:30
LPG Cylinder Price: केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमती कमी केल्यानंतर विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
Mallikarjun Kharge On LPG Cylinder Price: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (29 ऑगस्ट) घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा संबंध निवडणुकीशी जोडत काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियावरुन टीका करताना म्हटले की, “जेव्हा मतं कमी होऊ लागतात, तेव्हाच भेटवस्तू वाटल्या जाऊ लागतात. देशातील लोकांचा कष्टाचा पैसा लुटणारे निर्दयी मोदी सरकार आता माता-भगिनींबद्दल सद्भावना दाखवत आहे. गेली साडेनऊ वर्षे 400 रुपयांचे सिलिंडर 1100 रुपयांना विकून सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, तेव्हा तुम्हाला आपुलकी आठवली नाही. 140 कोटी भारतीयांवर साडेनऊ वर्षे अत्याचार केल्यानंतर आता लॉलीपॉप देऊन चालणार नाही. यामुळे तुमची एक दशकाची पापे धुतली जाणार नाहीत."
जब वोट लगे घटने, तो चुनावी तोहफ़े लगे बटने !
— Mallikarjun Kharge (@kharge) August 29, 2023
जनता की गाढ़ी कमाई लूटने वाली, निर्दयी मोदी सरकार, अब माताओं-बहनों से दिखावटी सद्भावना जता रही है।
साढ़े 9 सालों तक ₹400 का #LPG सिलेंडर, ₹1100 में बेच कर, आम आदमी की ज़िंदगी तबाह करते रहे, तब कोई “स्नेह भेंट” की याद क्यों नहीं…
खर्गे पुढे म्हणतात, "भाजपने आणलेल्या महागाईला तोंड देण्यासाठी काँग्रेस अनेक राज्यांमध्ये गरिबांसाठी केवळ 500 रुपयांना सिलिंडर वितरित करणार आहे. राजस्थानसारख्या अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. देशातील त्रस्त जनतेचा रोष तुमच्या 200 रुपयांच्या अनुदानाने कमी करता येणार नाही, हे मोदी सरकारने जाणून घेतले पाहिजे. तुम्ही इंडिया आघाडीला घाबरला आहात. आता जनतेने आपला निर्णय घेतला आहे. महागाईवर मात करायची असेल, तर भाजपला बाहेरचे दरवाजे दाखवणे, हाच पर्याय आहे," अशी टीका खर्गेंनी केली.
ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या दोन बैठका झाल्या आणि आज केंद्र सरकारने LPG गॅसची किंमत 200 रुपयांनी कमी केली. ही आहे इंडिया आघाडीची ताकद.