Congress President polls: खर्गे, थरूर की त्रिपाठी, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कोण? मधुसूदन मिस्त्री म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 07:51 PM2022-09-30T19:51:16+5:302022-09-30T19:51:44+5:30
Congress President polls: आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेस निवडणूक संघटना प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. काँग्रेस पक्षात शुक्रवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्याने गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेस निवडणूक संघटना प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि केएन त्रिपाठी यांचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. प्रत्येकजण स्वबळावर निवडणूक लढवत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सोनिया गांधी यांनी आपण कोणासोबत नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर असे कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही. गांधी परिवाराने कोणाच्याही उमेदवारीला दुजोरा दिलेला नाही.
मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून 14 अर्ज, शशी थरूर यांनी 5 आणि केएन त्रिपाठी यांनी 1 अर्ज दाखल केला आहे. उद्या आम्ही अर्ज तपासू आणि उद्या संध्याकाळी वैध अर्ज जाहीर करू. तसेच, उमेदवारी अर्जासोबतच उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. या 3 पैकी कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. याचबरोबर, या संपूर्ण प्रक्रियेत आपण तटस्थ राहणार असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आशीर्वाद आहेत असा कोणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
#CongressPresidentPolls | 14 forms submitted by (Mallikarjun) Kharge, 5 by Shashi Tharoor & 1 by KN Tripathi. Tomorrow,we'll scrutinise forms&tomorrow evening we'll announce forms that are valid&names of candidates: Madhusudan Mistry, Congress' Central Election Authority chairman pic.twitter.com/X0jp48Qf3x
— ANI (@ANI) September 30, 2022
तिसऱ्या नावाची चर्चा
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंजक बनत आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होईल, असे म्हटले जात होते. मात्र आता केएन त्रिपाठी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा कोणालाच अंदाज नव्हता. झारखंड सरकारचे माजी मंत्री केएन त्रिपाठीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. "मी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, त्याचा आदर केला जाईल", असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्रिपाठी म्हणाले.