काँग्रेस अध्यक्षपद प्रियांका गांधींकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:24 AM2019-07-18T04:24:07+5:302019-07-18T04:24:28+5:30
काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही. त्यामुळे अनिश्चितता निर्माण झालेली असताना अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे द्यावी, अशी कुजबुज सुरू झाली आहे.
तथापि, काँग्रेस नेत्यांनी उघडपणे त्यांच्या नावाचा पुरस्कार केलेला नाही. कारण अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहत राहुल गांधी यांनी २५ मे रोजीच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले होते की, काँग्रेस पक्षाने गांधी कुटुंबातील व्यक्तीऐवजी अध्यक्षपदासाठी दुसरी व्यक्ती शोधावी.
तीनदा लोकसभचे खासदार राहिलेले भक्त चरण दास यांनी म्हटले की, तळागाळापासून ते वरिष्ठ पदावरील काँग्रेस पक्षाचे लाखो नेते काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्याची मागणी करतील. ते मागणी करीत आहेत; परंतु त्यांची मागणी योग्य ठिकाणी पोहोचत नाही; परंतु सर्वांची हीच इच्छा आहे. प्रियांका गांधी यांच्यासोबत एक प्रभावशाली आणि विश्वसनीय नेतेही असावेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेतल्यास प्रियांका गांधी यांना पक्षाध्यक्ष केले जावे अािण पक्षाचे त्यांचे नाव सुचवावे, असे दास यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.
त्या योग्य पर्याय असतील, असे मला वाटते. राहुल गांधी आमच्या कुटुंबियातील व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा विचार करावा, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असल्याने लोक प्रियांका गांधी यांचे नाव जाहीरपणे पुढे करण्यास कचरत आहेत, असे जायस्वाल यांनी म्हटले आहे.
पक्ष सूत्रानुसार या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता नाही. सार्वमत होत नसल्याच्या स्थितीत काँग्रेस कार्यकारिणी राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकृत करील आणि त्यांचा उत्तराधिकार निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यांच्या प्रभारींना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
>अध्यक्ष नव्या पीढीतीलच हवा - दास
वय आणि लोकप्रियता हा घटक आहेच. भावी अध्यक्ष जास्त वयाचा नसावा. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्याप्रमाणे खूप मेहनत घेणारा असावा. त्यादृष्टीने ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जाते, असे दास यांनी म्हटले.