नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना काँग्रेसमध्ये चिंतेची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी होत आहे. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. उद्या संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी संपन्न होईल.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर हल्लाबोल केला होता. याशिवाय राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणत मोदींना वारंवार लक्ष्य केलं. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाददेखील राष्ट्रपती भवन येथे संपन्न होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित असतील.
मोदींच्या शपथविधीला राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 8:01 PM