'जिनपिंग यांना भेटताना मोदींच्या चेहऱ्यावरील तणाव लाईव्ह पाहिला'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 08:11 AM2018-04-28T08:11:46+5:302018-04-28T08:11:46+5:30

मोदींच्या चीन दौऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

congress president rahul gandhi on pm narendra modi china visit | 'जिनपिंग यांना भेटताना मोदींच्या चेहऱ्यावरील तणाव लाईव्ह पाहिला'- राहुल गांधी

'जिनपिंग यांना भेटताना मोदींच्या चेहऱ्यावरील तणाव लाईव्ह पाहिला'- राहुल गांधी

Next

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर आहे. शुक्रवारी व शनिवार असा दोन दिवस हा दौरा असून मोदींचा चीन दौरा हा पूर्णपणे अनौपचारिक आहे. मोदींच्या या चीन दौऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या भेटीचं फुटेज राहुल गांधी यांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिलं. 

जिनपिंग यांना भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय तणावात होते. असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं. तसंच चीनच्या राष्ट्रपतींना भेटण्याबरोबरच त्यांच्याशी काही देशहिताच्या गोष्टी करा, असा सल्लाही राहुल गांधी यांनी दिला आहे. 'डियर पीएम, तुमच्या कुठलाही दौऱ्या नसणाऱ्या चीन दौऱ्याचं फुटेज टीव्हीवर पाहिलं. तुम्ही खूप तणावात दिसत होतात. तुम्हाला पटकन एक आठवण करुन देतो, पहिले डोकलाम आणि दुसरा चीन पाकिस्तान इको कॉरिडोर जो भारतीय भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जात आहे. या मुद्द्यांवर तुम्हाला बोलताना देशाला ऐकायचं आहे. आम्ही तुमच्या नेहमी सोबत राहू, असं राहुल गांधी यांनी ट्विटवर म्हटलं. 



 

डोकलामला वादामुळे भारत-चीन यांच्यातील संबंध अद्याप तणावाचे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वुहान शहरात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीने दोन देशांतील तणाव कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शी जिनपिंग भारतात आले, तेव्हा त्यांनी मोदी यांना चीनला येण्याचं निमंत्रण दिलं होतं.

Web Title: congress president rahul gandhi on pm narendra modi china visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.