शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 4:32 PM

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस देणार पाठिंबा

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. काँग्रेस पक्ष या विधेयकाला पाठिंबा देईल, असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. राहुल गांधींचं हे पत्र भाजपाच्या तिहेरी तलाकच्या विधेयकाला उत्तर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाकडून याच अधिवेशनात तिहेरी तलाकसंबंधीचं विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका राहुल गांधींनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. याचसाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी गेल्या वर्षी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही. 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कार्यकाळात हे विधेयक संसदेच्या पटलावर मांडण्यात आलं होतं. 2010 मध्ये या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली. मात्र हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. 1993 मध्ये घटनेत दोनवेळा दुरुस्ती (दुरुस्ती क्र. 73 आणि 74) करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळालं. महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर घटनेत दुरुस्ती करावी लागेल. विविध पक्षांनी महिला आरक्षणात विविध समाजाच्या महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उपस्थित करत लोकसभेत लवकरात लवकर महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचं आवाहन केलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिलाreservationआरक्षणbillबिलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा