गुलाम नबी आझाद यांना पक्षात क्रमांक दोनचे पद देण्याचा प्रस्ताव सोनिया गांधींनी ठेवला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:35 AM2022-06-04T07:35:58+5:302022-06-04T07:45:34+5:30

सोनिया गांधी यांनी अगोदरच घरी बोलावून हे स्पष्ट केले होते की, त्यांना राज्यसभेत पाठविणे शक्य नाही.

Congress president Sonia Gandhi had proposed giving Ghulam Nabi Azad the number two position in the party | गुलाम नबी आझाद यांना पक्षात क्रमांक दोनचे पद देण्याचा प्रस्ताव सोनिया गांधींनी ठेवला; पण...

गुलाम नबी आझाद यांना पक्षात क्रमांक दोनचे पद देण्याचा प्रस्ताव सोनिया गांधींनी ठेवला; पण...

Next

- आदेश रावल

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून यापूर्वीच बाहेर झालेल्या गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अगोदरच घरी बोलावून हे स्पष्ट केले होते की, त्यांना राज्यसभेत पाठविणे शक्य नाही. त्याच्या प्रत्युत्तरात गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते की, हे सांगण्यासाठी येथे बोलविण्याची काय आवश्यकता होती. हे तर फोनवरूनही सांगता आले असते. 

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांना पक्षात क्रमांक दोनचे पद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता;
मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. याच चर्चेत गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना सांगितले की, आपला पक्ष चालविणारे युवा नेते आहेत. आमच्या आणि त्यांच्या विचारात फरक आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक नाही. 

पक्षाच्या कामात आझाद यांना रस नाही

असंतुष्ट गटातील नेते गुलाम नबी आझाद हे सध्या पक्षाच्या कार्यसमितीचे सदस्य आहेत. सोनिया गांधी यांना सल्ला देणाऱ्या राजकीय विभागाच्या समितीचेही ते सदस्य आहेत. गत काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद पक्षाच्या कामात रस घेताना दिसत नाहीत. असंतुष्ट गटातील नेतेही विखुरले आहेत.

Web Title: Congress president Sonia Gandhi had proposed giving Ghulam Nabi Azad the number two position in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.