नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नव्हता; सोनिया गांधींच्या भेटीनंतर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 09:13 AM2022-03-19T09:13:08+5:302022-03-19T09:14:39+5:30
Ghulam Nabi Azad meets Sonia Gandhi : जी २३ गटाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली.
काँग्रेसच्या 'G23' गटाच्या नेत्यांनी 'सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वा'ची मागणी केल्यानंतर दोन दिवसांनी या गटाचे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांची भेट घेतली. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या '१० जनपथ' या निवासस्थानी भेट घेतली.
"'काँग्रेस अध्यक्षांसोबत झालेली भेट चांगली होती. ही कदाचित तुमच्यासाठी बातमी असेल पण अध्यक्षांसोबत झालेली ही बैठक नियमित, सामान्य भेट होती. काँग्रेस पक्ष एकजुट होत आगामी निवडणुकीची तयारी कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नव्हता. CWC मध्ये कोणीही सोनिया गांधींना पद सोडण्यास सांगितलं नाही," असं आझाद म्हणाले.
Working Committee was asked for suggestions on the reasons for defeat in 5 states. The discussion was held to fight unitedly in the forthcoming Assembly elections to defeat the opposition parties: Congress leader Ghulam Nabi Azad after meeting party president Sonia Gandhi pic.twitter.com/av6WysOsom
— ANI (@ANI) March 18, 2022
गुरुवारी, आझाद यांनी सोनिया गांधींच्या घेतलेल्या भेटीच्या एक दिवस आधी, या गटाचे सदस्य भूपिंदर सिंग हुडा यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. एका तासाहून अधिक काळ चाललेल्या राहुल गांधी यांच्या भेटीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. हरियाणातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी हुड्डा यांना बोलावलं होतं.
सिब्बल यांनी साधला होता निशाणा
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर हा गट अधिक सक्रिय झाला आहे. या गटातील एक सदस्य कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबीयांनी काँग्रेसचं नेतृत्व सोडलं पाहिजे, असं म्हटलं होतं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं होतं. तसंच कोणत्या अन्य नेत्याकडे याची जबाबदारी सोपवण्यात यावी असंही ते म्हणाले होते.