काँग्रेसच्या 'G23' गटाच्या नेत्यांनी 'सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वा'ची मागणी केल्यानंतर दोन दिवसांनी या गटाचे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांची भेट घेतली. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या '१० जनपथ' या निवासस्थानी भेट घेतली.
"'काँग्रेस अध्यक्षांसोबत झालेली भेट चांगली होती. ही कदाचित तुमच्यासाठी बातमी असेल पण अध्यक्षांसोबत झालेली ही बैठक नियमित, सामान्य भेट होती. काँग्रेस पक्ष एकजुट होत आगामी निवडणुकीची तयारी कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नव्हता. CWC मध्ये कोणीही सोनिया गांधींना पद सोडण्यास सांगितलं नाही," असं आझाद म्हणाले.
सिब्बल यांनी साधला होता निशाणापाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर हा गट अधिक सक्रिय झाला आहे. या गटातील एक सदस्य कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबीयांनी काँग्रेसचं नेतृत्व सोडलं पाहिजे, असं म्हटलं होतं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं होतं. तसंच कोणत्या अन्य नेत्याकडे याची जबाबदारी सोपवण्यात यावी असंही ते म्हणाले होते.