कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी 30 जुलै संध्याकाळी 7 वाजता दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, नियमित चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमन डी. एस. राणा यांनी दिली आहे. २ फेब्रुवारीलाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयात केलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 8:47 PM