नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देश कोरोना बरोबरच आर्थिक संकटालाही सामोरा जात आहे. यापार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाच सूचनाही दिल्या आहेत. काँग्रेसने हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे.
या पत्रात सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मोदींकडे एमएसएमई सेक्टरसाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. तसेच एसएमई सेक्टरकडे दुर्लक्ष केल्यास एमएसएमईला मोठा फटका बसेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होईल, असेही म्हटले आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते, अमेरिका अन् फ्रान्सलाही टाकले मागे"
सोनिया गांधींनी दिलेल्या सूचना -
- सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करावी. जेने करून लोकांची नोकरीही वाचेल आणि या सेक्टरचे मनोबलही टिकून राहील.
- सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 1 लाख कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी फंड तयार करावा. जेनेकरून या सेक्टरकडे पुरेसे पैसेही राहतील. याचा उपयोग त्यांना अत्यंत आवश्यकता असेल तेव्हा करता येईल.
- सरकारने एमएसएमई सेक्टरसाठी 24 तास हेल्पलाइन जारी करावी. तसेच आरबीआय आणि इतर कमर्शियल बँकांनी हे निश्चित करायला हवे, की या सेक्टरशी संबंधित लहान व्यापाऱ्यांना वेळेवर कर्ज मिळेल.
- एमएसएमईअंतर्गत घेतलेल्या कर्जावरील व्याज भरणे 3 महिन्यांसाठी टाळण्यात यावे. तसेच सरकारने या क्षेत्राशी संबंधित टॅक्स माफ करण्यावर अथवा कमी करण्यावर विचार करावा.
- एमएसएमई सेक्टरला कर्ज भेटण्यास जे अडथळे येतात ते सरकारने दूर करावेत.
चीनबरोबरचे सर्व आर्थिक संबंध तोडा, युरोप अन् अमेरिकेनंतर 'या' देशांमध्ये होतोय कडाडून विरोध