“सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 03:32 PM2023-12-07T15:32:54+5:302023-12-07T15:35:45+5:30

Priyank Kharge Statement On Veer Savarkar: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

congress priyank kharge objectionable statement on veer savarkar and bjp replied | “सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

“सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

Priyank Kharge Statement On Veer Savarkar: सावरकर वीर नव्हते, मी प्रभारी असतो, तर सुवर्ण विधानसभेत लावलेला त्यांचा फोटो काढून टाकला असता, असे विधान कर्नाटकातीलकाँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी केले आहे. प्रियांक खरगे यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरगे यांनी केलेल्या विधानावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त करत पलटवार केला आहे. 

सावरकरांचे योगदान काय? काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत मी सावरकरांबद्दल दीड तास बोललो. सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपने सांगावे? सावरकरांना वीर ही पदवी कोणी दिली? सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजप सांगेल का? हे माझे वैयक्तिक मत आहे, सरकारचे नाही. माझ्या हाती असते तर, विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर अजिबात वीर नाही आणि याबाबत मी आव्हान द्यायला तयार आहे, असे प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे. 

प्रियांक खरगे अडाणी आणि अहंकारी आहेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बीके हरिप्रसाद यांनी प्रियांक खरगे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे योगदान शून्य आहे. प्रियांक खरगे यांचे मत बरोबर आहेत. सावरकरांचे चित्र काढून टाकावे, यात शंका नाही. भाजपची सत्ता असताना विधानसभेत सावरकरांचे चित्र लावण्यात आले होते. त्यांना इतिहास बदलायचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे योगदान काय होते हे जगाला माहीत आहे, अशी पुष्टी हरिप्रसाद यांनी जोडली. यावर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार करत प्रियांक खरगे हे अडाणी आणि अहंकारी आहेत, अशी टीका केली आहे. 

नेहमी देशविरोधी विधाने करतात

विधानसभेतून सावरकरांचे चित्र हटविल्यास तीव्र निषेध नोंदविला जाईल, असा इशारा भाजप आमदार भरत शेट्टी यांनी दिला. रियांका खरगे यांच्याकडे चुकीची माहिती आहे. त्यांना वाटते की तो सर्वात सुशिक्षित लोकांपैकी एक आहे, परंतु तो विधानसभेतील सर्वात अशिक्षित व्यक्ती आहे. सावरकरांचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यास केवळ सभागृहात नव्हे तर बाहेरही तीव्र विरोध केला जाईल, असे शेट्टी म्हणाले. तर, प्रियांक खरगे यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदार अश्वथ नारायण म्हणाले की, ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागात क्षमता सिद्ध करू द्या. ते अहंकारी आहेत, वादग्रस्त आहेत. ते नेहमीच देशविरोधी वक्तव्ये करत असतात, अशी टीका नारायण यांनी केली. 
 

Web Title: congress priyank kharge objectionable statement on veer savarkar and bjp replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.