शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 5:02 PM

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील UDF आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  भारतीय जनता पक्ष हा समानता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने फोडाफोडीचं राजकारण पाहिलं आहे, जिथे सत्ताधारी पक्षाने सत्तेत राहण्यासाठी लोकांचं लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा दावा प्रियंका यांनी केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्या एक 'योद्धा' आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या वायनाडच्या लोकांसाठी संसदेत आणि इतर प्रत्येक व्यासपीठावर लढतील जेणेकरून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतील. "मी मागे हटणार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला निराश करणार नाही. आता आपण एक कुटुंब आहोत" असं ही प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

चेरुकोडे व्यतिरिक्त प्रियंका वनदूर विधानसभा मतदारसंघातील थुवूर आणि कालिकावू शहरांमध्ये आणि निलांबूर विधानसभेच्या पूकूट्टूमपदममधील सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी या सात नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

मलप्पुरम जिल्ह्यातील वानदूर विधानसभेतील चेरुकोडे येथे एका सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा असे लोक राजकारणात शक्तिशाली बनतात तेव्हा ते लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष देत नाहीत. भाजपाच्या राजवटीत देशात शेतकरी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणतीही आधार व्यवस्था नाही. लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो, मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच आधाराची गरज आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळ