प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात केव्हा उतरणार? स्वतः त्यांनीच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 04:46 PM2021-02-26T16:46:17+5:302021-02-26T16:52:07+5:30
जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. (Priyanka Gandhi husband Robert Vadra)
जयपूर - गांधी कुटुंबाचे जावई आणि व्यापारी रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) शुक्रवारी जयपूर (Jaipur) येथे आले होते. यावेळी त्यांनी मोती डूंगरी मंदिरात गणपतीचे दर्शण घेतले. जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. कोरोनादरम्यान ते पहिल्यांदाच जयपुरात आले होते. (Congress Priyanka Gandhi husband Robert Vadra said about entry in politics)
दिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते रॉबर्ट वाड्रा अन् प्रियंका गांधी; जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी
जेव्हा राजकीय लढाई आवश्यक वाटेल तेव्हा राजकारणात येईन -
सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भात विराचले असता, रॉबर्ट वाड्रा म्हणाले, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य वेळ असायला हवी. मी राजकारणापासून दूर असूनही काम करत आहे. एखादी लढाई राजकीय दृष्या आवश्यक आहे, असे जेव्हा वाटले, तेव्हा ती लढाई लढण्यासीठी मी नक्कीच राजकारणात येईन.
...तर शेतकरी आंदोलन संपेल -
शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यावर बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला हवी, त्यांच्याशी चर्चा झाली तर शेतकरी आंदोलन संपेल. सरकारने एखादी योजना तयार केली तर त्या योजनेशी लोकांना जोडावे लागेल. केंद्र सरकारने लोकांवर दबाव टाकू नये. महागाईवर बोलताना वाड्रा म्हणाले, यामुळे लोकांचा त्रास वाढत आहे. एवढेच नाही, तर माझ्या जवळपासचे लोक म्हणतात, की आपण आमचा आवाज उचलावा.
“...आता मला संसदेत गेलंच पाहिजे”; रॉबर्ट वाड्रांच्या राजकीय एन्ट्रीला कोण लावतंय ब्रेक? जाणून घ्या
मी राजकीय गोष्टीत पडत नाही -
देशभरात काँग्रेस कमकुवत होत असल्यासंदर्भात आणि कठोर निर्णय घेण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय विषयात पडू इच्छित नाही, असे वाड्रा म्हणाले. मी केवळ लोकांना होत असलेला त्रास प्रकाशात आणतो. सायकलवरून ऑफिसात जाणेही, याच प्रकारचे एक प्रतिकात्मक पाऊल होते. आम्ही काम करत राहू. लोक समजतील आणि आम्ही त्याचा आवाज उचलत राहू, असे वाड्रा म्हणाले.
सरकार सुरुवातीपासूनच निशाणा करत आहे -
गांधी आणि वाड्रा कुटुंबाला सरकार निशाणा बनवत आहे, असे विचारले असता, ते म्हणाले, हे सुरुवातीपासूनच सुरू आहे, सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. तपास संस्था जेजे मागत आहेत, ते मी सर्व प्रकारे स्पष्ट करत आहे. आम्ही लोकांसाठी काम करतो. यामुळेच आम्हाला निशाणा केले जात आहे.