Priyanka Gandhi : "घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:42 PM2023-03-23T14:42:44+5:302023-03-23T14:52:30+5:30

Congress Priyanka Gandhi And Modi Government : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Congress Priyanka Gandhi Slams Modi Government Over Rahul Gandhi | Priyanka Gandhi : "घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण..."

Priyanka Gandhi : "घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय पण..."

googlenewsNext

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी आपला निर्णय दिला आहे. 

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझ्या भावाला कधी भीती वाटली नाही आणि वाटणारही नाही. सत्य बोलत जगलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… सत्याची ताकद आणि करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे" असं प्रियंका गांधी य़ांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी आज या कोर्टात पोहोचले होते. यावेळी कोर्टाने राहुल गांधींना तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का असे विचारले. यावेळी राहुल यांनी मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले. सुरतच्या जिलल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम 504 अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम 504 मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामिनही दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Congress Priyanka Gandhi Slams Modi Government Over Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.