Priyanka Gandhi : "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 08:16 AM2022-08-05T08:16:09+5:302022-08-05T08:23:10+5:30

Congress Priyanka Gandhi And Shivsena Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Congress Priyanka Gandhi Tweet Over Shivsena Sanjay Raut And Slams BJP | Priyanka Gandhi : "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य"

Priyanka Gandhi : "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य"

googlenewsNext

नवी दिल्ली -  मुंबईतील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी 1 हजार 34 कोटी रुपयांच्या  झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने राऊतांना अटक केली. त्यानंतर, न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊत यांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आता, राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, कारण ते भाजपाच्या छळ-कपटाच्या राजकारणाला घाबरले नाहीत आणि त्यांचा सामना त्यांनी केला. भीती आणि धमकी भित्र्यांची हत्यारं आहेत, सत्याच्या वारासमोर हे टिकणार नाहीत" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

 संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही भाजपावर निशाणा साधला होता. "राजाचा संदेश साफ आहे. जो माझ्याविरुद्ध बोलेल, त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी एजन्सीचा गैरवापर करून विरोधकांचा आत्मविश्वास तोडण्याचं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण हुकूमशहाने ऐकावं, शेवटी सत्यच जिंकेल आणि अहंकार हरेल" असं राहुल गांधी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले होतं.

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ 4 दिवसांची कोठडी दिल्यामुळे संजय राऊत यांना जामीन मंजूर होऊन दिलासा मिळणार की, कोठडीत वाढ होणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही काळ वाढला आहे. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जे अलिबागमधील जमिन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तसेच, 10 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.   
 

Web Title: Congress Priyanka Gandhi Tweet Over Shivsena Sanjay Raut And Slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.