देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीदेखील विद्यार्थ्यांच्या बाजूनं पुढे आल्या आहेत. कोरोनासारख्या या कठोर परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा देण्यास सांगितल्यामुळे प्रियंका गांधी यांनी CBSE बोर्डाला फटकारलं असून ते विद्यार्थ्यांविषयी बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे."सध्याच्या परिस्थितीत सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणे हे बेजबाबदारपणाचं आहे. बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा शेड्यूल केल्या पाहिजेत अथवा परीक्षा अशा प्रकारे घ्याव्यात की गर्दी असलेल्या केंद्रांमध्ये मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसेल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला फटकारलं.
Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 11:17 AM
Coronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी
ठळक मुद्देदेशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या१ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी