काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:47 AM2019-04-17T08:47:42+5:302019-04-17T08:51:32+5:30

कर्नल जे के सिंह हे निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी नीतिका सिंह यांनी हा आक्षेप घेतला आहे.

Congress promotion song is stuck in copyright dispute | काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात

काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात

Next

धनबाद : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रचारगीत तयार केले असून ठिकठिकाणी जाहिरातींमध्ये ते वापरले जात आहे. मात्र, हे गीत वादात सापडले असून धनबादच्या निवृत्त कर्नलच्या पत्नीने या गीताचे बोल आपल्या पतीच्या कवितेतील असल्याचा दावा केला आहे. यासंबंधी तिने काँग्रेसचे अध्यक्ष राहिल गांधी यांना खुले पत्र लिहिले आहे. 


कर्नल जे के सिंह हे निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी नीतिका सिंह यांनी हा आक्षेप घेतला आहे. तिच्या म्हणण्यानुसार जे के सिंह यांनी 'मैं सारा हिंदुस्तान हूं' हा कवितासंग्रह लिहिला आहे. नुकत्याच 25 फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे गीत नॅशनल स्टेडियमवर जमलेल्या 20 हजार माजी सैनिकांसमक्ष म्हटले होते. कर्नल जे के सिंह हे भारतीय सेनेचे प्रसिद्ध उद्घोषक आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारणही झाले होते. 


यापूर्वी सिंह यांनी या कविता संग्रहाचे प्रकाशन 13 एप्रिल 2012 मध्ये जालियनवाला बागेत केले होते. कांग्रेसद्वारे टीव्हीवर दाखविण्याचे येणारे 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' हे गीत याच कविता संग्रहातून प्रेरित आहे. हा प्रकार कॉपी राईटचे उल्लंघन आहे. जर कांग्रेसला हे गीत पुढेही दाखवायचे असल्यास त्यांनी आपले संमतीपत्र घ्यावे. या बदल्यात आम्हाला पैसे नकोत. पण काँग्रेस पक्षाने झारखंडच्या कोणत्याही शहीद सैनिक किंवा पोलिसाच्या परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नीतिका सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Web Title: Congress promotion song is stuck in copyright dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.