ED Sonia Gandhi Questioning: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीविरोधात देश भरातील विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. बेंगळुरूमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत एक सँट्रो कार पेटवून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार एका काँग्रेस कार्यकर्त्याचीच असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल-प्रियांका सोनियांसोबत होते75 वर्षीय सोनिया गांधी दुपारी 'Z+' सुरक्षेत ईडीच्या मुख्यालयात पोहोचल्या. सोनिया गांधींसोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही होत्या. प्रियांका गांधींना प्रवर्तन भवन मुख्यालयात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून त्या आपल्या आईसोबत राहू शकतील आणि आरोग्याच्या समस्या असल्यास लक्ष देऊ शकतील. मात्र त्यांना चौकशी कक्षापासून दूर ठेवण्यात आले आहे.
काँग्रेसचा केंद्रावर आरोपदरम्यान, सोनिया गांधींच्या चौकशीपूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांचे निवासस्थान ते ईडी कार्यालय दरम्यानच्या एक किलोमीटरच्या अंतरावर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. परिसरात वाहतुकीसही बंदी घालण्यात आली. पक्षाने या कारवाईला राजकीय सूड असल्याचे म्हटले. सोनिया गांधी यापूर्वी 8 जून आणि त्यानंतर 23 जून रोजी ईडीसमोर हजर राहणार होत्या, परंतु कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्या हजर होऊ शकल्या नाहीत.
काय प्रकरण आहे?सोनिया गांधींची चौकशी काँग्रेसशी संलग्न असलेल्या 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी आहे. या प्रकरणी एजन्सीने सोनिया गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची गेल्या महिन्यात पाच दिवसांत 50 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. सोनिया आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि भागधारक आहेत.