नोटाबंदीविरोधात काँग्रेसची धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:05 AM2018-11-07T05:05:14+5:302018-11-07T05:05:27+5:30
नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत. ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांनी संपूर्ण ताकदीने रस्त्यांवर उतरून सरकारला तुमचा निर्णय चुकीचा होता याची जाणीव करून द्यावी, असे आदेश दिले आहेत. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले की, हे सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेलाही गुलामगिरीच्या साखळदंडांत बांधू इच्छिते. सरकार निवडणुकीत लागणाऱ्या पैशांसाठी रिझर्व्ह बँकेवर दडपण आणत असल्याचाही आरोप तिवारी यांनी केला. रिझर्व्ह बँकेचा याबाबत सरकारला विरोध आहे, असेही ते यावेळी म्हणाले.