Rafale Deal Controversy: राफेलची किंमत सांगा, 5 कोटी मिळवा; बिहारमध्ये पोस्टर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:51 AM2018-10-17T09:51:46+5:302018-10-17T09:52:29+5:30
Rafale Deal Controversy: काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद-विवाद सुरु आहे.
पाटणा : काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद-विवाद सुरु आहे.
शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेल्या 35 विमानतळांची नावे आणि राफेलची किंमत सांगणाऱ्या व्यक्तीला जवळपास 5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. येथील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ क्षत्रिय आणि व्यंकटेश रमन यांच्या नावे शहरातील मुख्य चौकांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या या पोस्टरबाजीला भाजपाने उत्तर दिले आहे. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले पोस्टरमध्ये देण्यात आलेले बक्षिस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच जिंकतील. तसेच, कोणतेही कारण नसताना राफेल खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि केंद्र सरकारला राहुल गांधी ओढत असल्याचा आरोप त्यांनी केला.